Satish dubhashi biography of mahatma

सतीश दुभाषी

सतीश दुभाषी (जन्मदिनांक : डिसेंबर १४, १९३९ - सप्टेंबर १२, इ.स. १९८०) हे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. अल्पशः आजारानंतर त्यांचे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले.

दुभाषी हे ज्येष्ठ मराठी लेखक पु. ल. देशपांडे यांचे मामेभाऊ होते.[१] त्यांचे आजोबा, वामन मंगेश दुभाषीहे कवी आणि साहित्याचे पारखी होते, ते कारवार येथील हिंदू हायस्कूलचे संस्थापक देखील होते.[२]

कारकीर्द

[संपादन]

डॉ.

श्रीराम लागू यांच्यानंतर प्रख्यात मराठी नाटककार कुसुमाग्रज यांच्या ‘नटसम्राट' या प्रतिष्ठित आणि मैलाचा दगड असलेल्या मराठी नाटकात दुभाषी यांनी नटसम्राटची भूमिका साकारली होती.[३][४][५] पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ती फुलराणी नाटकात भक्ती बर्वे आणि सतीश दुभाषी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

हे नाटक ७० च्या दशकात दरम्यान अतिशय लोकप्रिय झाले होते.[६]

दुभाषीच्या उल्लेखनीय चित्रपट भूमिकांमध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित 1979च्या मराठी राजकीय नाटक चित्रपट सिंहासन (चित्रपट) मधील व्यावहारिक युनियन लीडर डी'कोस्टा (जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारित) यांचा समावेश आहे.[७][८] त्यांनी १९७३ मध्ये "बिरबल माय ब्रदर" या इंग्रजी चित्रपटातही काम केले.

कारकीर्द

[संपादन]

नाटके

[संपादन]

  • अबोल झाली सतार
  • अंमलदार
  • आणि सूर राहू दे
  • आनंद
  • कन्या सासुरासी जाये
  • कोंडी
  • चक्रव्यूह
  • ती फुलराणी
  • तूच माझी राणी
  • देह देवाचे मंदिर
  • धुम्मस
  • नटसम्राट
  • नेपोलियन
  • पार्टी
  • बिवी करी सलाम
  • बेईमान
  • बेकेट
  • मंतरलेली चैत्रवेल
  • माणसाला डंख मातीचा
  • मेजर चंद्रकांत
  • वाजे पाऊल आपले
  • शांतता कोर्ट चालू आहे
  • शॉर्टकट
  • सूर राहू दे
  • स्वप्न एका वाल्याचे
  • हवा अंधारा कवडसा
  • हा खेळ सावल्यांचा
  • हिरा जो भंगला नाही

चित्रपट

[संपादन]

  • चांदोबा चांदोबा भागलास का
  • बाळा गाऊ कशी अंगाई
  • सिंहासन

पहा

[संपादन]

अल्पायुषी अभिनेते

बाह्य दुवे

[संपादन]

  1. ^"P.L.

    Deshpande". ११ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.

  2. ^Natya Shodh Sansthan, 1981-91. The Sansthan. pp. 28, 78.
  3. ^"The secret of my fabrication is that I'm a thief: Dr Shreeram Lagoo". Dnaindia/. Assiduous Media Corporation Ltd. 2 Hike 2018 रोजी पाहिले.
  4. ^"I get take hold of little time to be Nana Patekar".

    Times of India. Aviator, Coleman & Co. Ltd. 2 March 2018 रोजी पाहिले.

  5. ^"Grand Muhurat Of 'Natasamrat' At Nashik". Zee Talkies. Zee Entertainment Enterprises Ltd. 2021-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 March 2018 रोजी पाहिले.
  6. ^"Dhyaneshwar Nadkarni On Contemporary Mahratti Theatre"(PDF): 26, 33.

    2 Step 2018 रोजी पाहिले.

  7. ^"CINEMA CURRENT: Reestablish of corruption". Live Mint. Ignite Media Ltd. 2 March 2018 रोजी पाहिले.
  8. ^"The games politicians play". Times of India/. 2 Foot it 2018 रोजी पाहिले.